<%@ page contentType="text/html; charset=UTF-8" pageEncoding="UTF-8" %> Matrimonial - Indian Marathi Wedding - Navra Baiko - NavraBaiko.com
<%@include file="topPanelAd_nb.jsp" %>
<%@ include file="menu_nb.jsp" %>
<%@ include file="loginPage_nb.jsp" %>

About Us

लग्न...लग्न...लग्न ...म्हणजे काय असतं?

जो भेटतो तो विचारतो...कधी करताय ? काय ठरलं की नाही...कोणी भेटलं की नाही.... काय लोक सुध्दा असतात, सु़खाने जगू सुध्दा देत नाहीत.

घरी गेलो व गेले... आई विचारते अरे किव अगं काही विचार केलास का? बाबा तर सरळ अ‍ॅटॅकच करतात... मा़झ्या अमक्या तमक्याचा, मेव्हण्याचा... आता हे सार फारच झालं आहे असं तुम्हालाही वाटतं का? खरं सांगू ...तु़झं लग्न कधी करायचं असा प्रश्न घरच्यांनी विचारला की आपले ठाम उत्तर असते... एवढी घाई काय आहे? पण तेव्हाच आपल्या मनात त्या लग्नरुपी बॉबला काडी लागलेली असते. कधी वात खूप लांब असते तर कधी छोटी तरी कधी कधी बाँबच फुसका ठरतो.

पण जेव्हा मुलगा केव्हा मुलगी नाही... नाही म्हणते तेव्हाच तो खरा ...' हो' असतो !

आता लग्न म्हणजे सुखी आयुष्याला पिजर्‍यात कोंडण, मजेला लगाम लावणं,वेळेत निघणं व वेळेत घरी येणं ...दुसरीकडे न पाहणं वगैरे वगैरे समज आहेत पण तरीही लग्नाला भारतात तरी पर्याय नाही... आणि त्यासारखे गोजिरवाणेही काही नाही. जन्माला आल्यावर रडायचे ...इतरांनी झुलवायचे आणि मग जरा मोठे झाल्यावर इतरांना खेळवायचे ... मग झुलवायचे आणि मग झुलायचे !

पण या झुलण्यातही आनंद आहे आणि तो मिळवण्यासाठी थोडे तर कधी जास्त झगडावेही लागते. गरमा गरम वडा छान लागतो पण कधी त्यानेही तोंड भाजते..व थंडगार बिअर मस्त असून त्याने सर्दीही होते.. आता मला सांगा या सार्‍याचा मेळ कसा घालायचा?

बायको सुंदर हवी..नवरा हॅन्डसम हवा...पैसा रग्गड हवा. स्वयंपाकात तरबेज हवी ...मनाने प्रेमळ हवी... किती अटी...पण तरीही लग्न होतातच !

लग्न म्हणजे...योग्य जोडीदार मिळवणे.

दिसण्यावरच जायच म्हटल तर प्रत्येकालाच रेखा...ऐश्वर्या... पाहिजेच होती की ...पण त्यांचे चोचले आपण पुरवू शकू कां ? ती आपल्याला संध्याकाळी दमून आल्यावर गरम पोहे व चहा देईल का? ... केवढे प्रश्न आहेत. अमिताभने दिवारमध्ये सहा जणांना कुटलं पण तो घरी दाण्याचे कूट करील का ?

तेव्हां..... हा ज्याचा त्याच्या नशिबाचा आणि प्रामाणिकतेचा भाग असतो.स्वप्न नेहमीच मोठी ...खोटी किंवा धुसर असतात पण सत्य आपणच शोधायचे असते...

पूर्वी कथेमध्ये नद्या, नाले, पर्वत पार करुन त्या राक्षसाच्या मुकुटावरील हिरा आणलास तर राजकन्या तुझी... अश्या नवलकथा आपण वाचायचो... काळ बदलला... स्टोरी बदलली आता आपल्याला कोठेही न जाता, घर बसल्या ' लोड शेडींग' नसेल तर आपला राजपुत्र वा राजकन्या... जी आपली आयुष्याची जोडीदारीण Care To share होणार आहे ती प्राप्त होऊ शकते आमच्या या नवराबायको.कॉम साईटवर

कोणी पहिलं बसायचं म्हणून भांडू नका... स्थळासाठी हेच एकमेव योग्य स्थळ आहे.!

Nikhil Bhide
Founder

www.NavraBaiko.com
स्थळासाठी योग्य स्थळ
Ansh Hospitality Services



<%@include file="rightPanelAd_nb.jsp" %>
<%@include file="bottomPanelAd_nb.jsp" %>
<%@include file="footer_nb.jsp" %>